Belagavi

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे बेळगावात जोरदार स्वागत

Share

बेळगावात आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्यासह भाजप नेत्यांनी सांबरा विमानतळावर जोरदार स्वागत केले.

विविध कार्यक्रमांसाठी आज मंगळवारी बेळगावात आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची बी.वाय. विजयेंद्र आणि माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांबरा विमानतळावर भेट घेतली. त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

यावेळी भाजपचे माजी आमदार संजय पाटील, महानगर सरचिटणीस मुरुगेंद्रगौडा पाटील, भाजप राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, आमदार महेश टेंगीनकाई यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

Tags: