Belagavi

एकत्रित काम करून समाजात घडवूया सकारात्मक बदल : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Share

महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी माजी सैनिकांनी आपल्या अनुभवातून व सेवाभावनेतून समाजसेवेत अधिकाधिक सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

रविवारी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील कंग्राळी बीके गावात माजी सैनिक विकास सेवा संघाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. बेळगाव जिल्ह्यात विशेषत: बेळगावच्या ग्रामीण भागात सैनिक व माजी सैनिकांची संख्या मोठी आहे. या गोष्टीचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. महान त्याग केलेल्या आणि राष्ट्रसेवेतून निवृत्त झालेल्या तुम्हा सर्वांनी एक संघटना स्थापन केली आहे. माझ्याकडून तुम्हाला जी काही मदत आणि सहकार्य लागेल ते द्यायला मी तयार आहे. याशिवाय समाजसेवेच्या माध्यमातून तुम्ही समाजासाठी मोठे योगदान देऊ शकता, असे मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या .

मला तुमच्याबद्दल आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाबद्दल विशेष आदर आहे. तुम्ही देशासाठी केलेले कार्य शब्दात व्यक्त करता येणार नाही. येणाऱ्या काळात आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करूया आणि समाजात सकारात्मक बदल घडवूया, असे त्या म्हणाले.

कार्यक्रमात गावातील ज्येष्ठ, माजी सैनिक विकास संघाचे अध्यक्ष रामा तारिहाळकर, उपाध्यक्ष अरुण पाटील, ग्रामपंचायत अध्यक्षा कौसर जहाँ सय्यद, काकती सीपीआय उमेश, बसप्पा तलवार, अर्चना पाटील, संध्या चौघुले, पंचायत विकास अधिकारी गोविंद रंगप्पगोल, हिंडाल्कोचे वरिष्ठ व्यवस्थापक दिनेश नाईक, ग्रामपंचायत कर्मचारी दयानंद कुगजी, ग्रामपंचायत सचिव सी. के. तलवार, ग्रामपंचायत सदस्य, माजी सैनिक संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Tags: