विजयपूरचे भाजप खासदार रमेश जिगजीनगी यांची प्रकृती पुन्हा खालावली असून त्यांना तातडीने बेळगाव केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती प्रदेश भाजप उपाध्यक्ष अनिल बेनके यांनी दिली .

विजयपुरचे भाजप खासदार रमेश जिगजिनगी यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. या पार्श्वभूमीवर काल (२ मार्च) रात्री उशिरा त्यांना बेळगावातील केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे. गेल्या २८ जानेवारी रोजी विजयपूर ते बागलकोट या मार्गावर जात असताना त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास झाला. त्यांना तातडीने बागलकोट कुमारेश्वर रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता पुन्हा रमेश जिगजीनगी यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

रात्री उशिरा त्यांना बेळगावच्या केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मात्र, रुग्णालयातील डॉक्टर कोणालाही भेटू देत नाहीत. काल हॉस्पिटलच्या भेटीदरम्यान त्यांना आत प्रवेश देण्यात आला नाही. आज पुन्हा हॉस्पिटलला भेट देऊन माहिती घेणार असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके यांनी सांगितले.


Recent Comments