Belagavi

बेळगावातील माळमारुती पोलीस स्थानक बनले आदर्श

Share

बेळगावचे माळमारुती पोलिस स्थानक आता लोकाभिमुख, जनस्नेही पोलिस ठाणे झाले आहे. पोलीस यंत्रणेची आवश्यक माहिती देणारे भिंतीवर लावलेले आकर्षक फलक, बोधचित्रे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

बेळगावचे माळमारुती पोलीस स्थानक आता लोकाभिमुख, जनस्नेही पोलीस स्थानक बनले आहे. माळमारुती पोलीस स्थानकाच्या अतिथी कक्षाचे पोलीस आयुक्त सिद्रामप्पा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शहर पोलीस आयुक्त सिद्रामप्पा यांनी अतिथी कक्ष उभारणीत आर्थिक मदत करणाऱ्या प्रभाकर शेट्टी, गिरीश, अनिल पटेल, मुथुराजू, अफजल बेगम यांचा गौरव केला.

अतिथी कक्षाच्या भिंतींवर बुद्ध बसवण्णा, सिद्धेश्वर स्वामीजींच्या आदर्शांची आकर्षक चित्रे रेखाटण्यात आली आहेत. शिवाय पोलीस यंत्रणेची आवश्यक माहिती दिली आहे. माळमारुती स्टेशनला ‘जनस्नेही पोलिस’ या संकल्पनेतून नवे रूप मिळाले आहे. पोलीस आयुक्त सिद्रामप्पा यांचा माळमारुती व एपीएमसी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पोलिस आयुक्त सिद्रामप्पा म्हणाले की, माळमारुती पोलिस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर म्हणून आल्यापासून जे. एम. कालीमिर्ची यांनी बरेच सकारात्मक बदल केले आहेत, त्यांनी माळमारुती पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या अशोक नगर, रामतीर्थ नगर आणि ऑटो नगरमध्ये चांगले वातावरण निर्माण केले आहे, त्यांनी जनतेच्या मनातील भीती दूर केली आहे. त्यांनी या भागातील चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणले आहे. पोलीस विभागाच्या कामाबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम खरोखरच कौतुकास्पद असून, हा जनतेचा विजय झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला एसीपी गंगाधर, इन्स्पेक्टर जे. एम. कालीमिर्ची, मार्केट आणि माळमारुतीचे पोलीस कर्मचारी, प्रभाकर शेट्टी, गिरीश, अनिल पटेल अफजल बेगम उपस्थित होते.

Tags: