Vijayapura

विजयपुरात सापडला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

Share

विजयपूर रेल्वे पोलीस ठाण्या च्या व्याप्तीत अंदाजे 50 ते 55 वर्षे वयोगटातील अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी जनतेला या सापडलेल्या व्यक्तीच्या वारसांचा शोध घेण्याचे आवाहन केले आहे.

सदर मृताची उंची 5 फूट 6 इंच असून , , गडद रंग, सडपातळ बांधा, सरळ नाक, डोक्यावर 2 इंच पांढरे-काळे मिश्रित केस, अर्धा इंच पांढरा खोड, मिशा, चॉकलेटी रंगाचा हाफ-स्लीव्ह रेडिमेड शर्ट, चॉकलेटी रंगाची पँट घातली असे या व्यक्तीचे वर्णन आहे. वारस आढळल्यास, संरक्षण उपनिरीक्षक, किंवा रेल्वे पोलीस नियंत्रण कक्ष ०८०-२२८७१२९१ येथे कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: