काँग्रेसचे राज्यसभा सदस्य नसीर हुसेन यांच्या विजयोत्सवात समर्थकांनी विधानसौधमध्ये पाकिस्तान समर्थक घोषणा दिल्याच्या निषेधार्थ बेळगावात भाजप कार्यकर्त्यांनी आज जोरदार आंदोलन केले.
काँग्रेसचे राज्यसभा सदस्य सय्यद नसीर हुसेन यांच्या विजयोत्सवात समर्थकांनी काल, मंगळवारी विधानसौधमध्ये पाकिस्तान समर्थक घोषणा दिल्याच्या निषेधार्थ बेळगावात भाजप कार्यकर्त्यांनी बुधवारी जोरदार निदर्शने केली. चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. नासीर हुसैन यांच्या समर्थकांनी पाकिस्तान समर्थक घोषणा देऊन देशद्रोह केला आहे. त्यांना तातडीने अटक करून हद्दपार करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. “इडली सांबार अच्छा है, नासीर हुसेन लुच्चा है” अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचा राजीनामा मागितला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

भाजपचे कार्यकर्ता रमेश देशपांडे म्हणाले की, राज्यात मोठी निषेधार्ह घटना घडली आहे. लोकशाहीच्या मंदिरात पाकिस्तान जिंदाबादचा नारा देणे निंदनीय आहे. याला काँग्रेस नेत्यांचा आणि काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. नासीर हुसेन यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा. प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणाऱ्या प्रियांक खर्गे यांनी यावर बोलले पाहिजे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नसीर हुसेन यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली.
भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी बेळगाव काँग्रेस सभागृहाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला आणि महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी खेचल्याची घटनाही घडली, भाजप प्रदेश सरचिटणीस उज्वला बडवाण्णाचे यांना पोलिसांनी ओढत नेले आणि नंतर पोलिसांच्या वाहनात खेचून ताब्यात घेतले.


Recent Comments