पोलिस खात्यात काम करणाऱ्यांनी परिस्थितीनुसार धैर्याने काम करावे, असे आवाहन मावळते शहर पोलिस आयुक्त एस. एन. सिद्रामप्पा यांनी केले.
पोलीस आयुक्त एस. एन. सिद्रामप्पा निवृत्त होणार असल्याने पोलीस कवायत मैदानावर आज बुधवारी सिद्रामप्पा यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. डीसीपी रोहन जगदीश, डीसीपी स्नेहा पीव्ही यांनी सहभाग घेऊन आयुक्तांचा सत्कार केला. यावेळी विविध पोलीस तुकड्यांनी शानदार पथसंचलन करून सिद्रामप्पा यांना मानवंदना दिली.
पोलिसांकडून मानवंदना स्वीकारल्यानंतर बोलताना पोलीस आयुक्त एस. एन. सिद्रामप्पा यांनी सर्वप्रथम पोलीस अधिकाऱ्यांचे आभार मानले. 1999 मध्ये दुसऱ्या खात्यातून पोलीस विभागात आलो. डीवायएसपी पदाची परीक्षा दिली. परिपूर्ण पोलीस अधिकारी बनायचे असेल तर प्रशिक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विजयपूर एसपी, रेल्वे विभागाचे एसपी म्हणून सेवा करून निवृत्तीच्या वेळी बेळगावला पोलिस आयुक्त म्हणून आलो, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, सीमावर्ती बेळगाव जिल्ह्याचे पोलीस आयुक्त म्हणून आल्यानंतर त्यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेचे निरीक्षण केले, त्यानंतर शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था राबवली, गणेशोत्सव, कन्नड राज्योत्सव, विधिमंडळ अधिवेशन यशस्वी केले. एमईएसला काळा दिवस साजरा करू दिला नाही. शहरातील अनेक समस्या, प्रकरणांवर तोडगा काढला. सर्वांच्या सहकार्याने जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली, असे त्यांनी सांगितले.
पोलिस खात्यात काम करणाऱ्यांनी परिस्थितीनुसार धाडसाने काम करावे, असे सांगून ते म्हणाले, बेळगावातील गणेशोत्सवासारख्या प्रसंगी 18 ते 20 तास काम करावे लागते. या कार्यक्रमात डीसीपी रोहन जगदीश, डीसीपी स्नेहा पी. व्ही., सीएआर एएसपी उमेश, सर्व एसीपी, डॉ. गिरीश सोनलवलकर, डॉ. सतीश नेर्ली व बेळगावचे नागरिक आदी उपस्थित होते


Recent Comments