नरेगा मजुरी 600 रुपये आणि नरेगा मनुष्यदिवस 200 करण्याच्या मागणीसाठी सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया (कम्युनिस्ट) च्या कार्यकर्त्यांनी बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

नरेगा मजुरी 600 रुपये आणि मनुष्य दिवस 200 करण्यासाठी पावले उचलावीत. दुष्काळी कामे तातडीने हाती घेण्यात यावी, गुरांसाठी चारा केंद्र सुरू करण्यात यावे, तरुणांना रोजगार देण्यासाठी रिक्त पदे भरण्यात यावीत. जिल्ह्याला मंजूर झालेले विविध सिंचन प्रकल्प तात्काळ सुरू करून मुदतीत पूर्ण करावेत. जिल्ह्यातील सर्व तलाव भरावेत आदी मागण्या आंदोलकांनी केल्या. आंदोलनात रामांजनप्पा अल्दल्ली, कलगौडा पाटील, सिद्धनगौडा पाटील, अनव्वा देसाई आदी सहभागी झाले होते.


Recent Comments