Belagavi

हलगा येथील सैबन्नावर पिता-पुत्रांकडून विठ्ठल-रखुमाई मंदिराला चांदीचे किरीट

Share

हलगा येथील प्रतिष्ठित नागरिक चारुकिर्ती सैबन्नावर व त्यांचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते सुहास सैबन्नावर यांनी श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराला चांदीचे किरीट भेट दिले आहे.

हलगा येथील सैबन्नावर पिता-पुत्रांनी गावातील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराला श्री विठ्ठल-रखुमाई मूर्तीसाठी दीड किलो वजनाचे चांदीचे किरीट दान म्हणून दिले. विठ्ठल देवस्थान कमिटीच्या समक्ष कागदोपत्रांसह हे किरीट सुपूर्द करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते श्री विठ्ठल रखुमाई पूजन करण्यात आले.

त्यानंतर मान्यवरांची भाषणे झाली. या कार्यक्रमात मंदिर कमिटी सदस्य, भजनी मंडळ व गावातील महिला, नागरिक भक्तगण उपस्थित होते

Tags: