बेळगाव हाय-टेक टीव्हीएस फेस्टिव्हलच्या लकी ड्रॉ कूपन विजेत्यांची घोषणा समारंभपूर्वक करण्यात आली. विजय के यांना टीव्हीएस ज्युपिटर बाईकचे प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले.
बेळगावातील हायटेक टीव्हीएस शोरूम ही उत्तर कर्नाटकातील ऑटोमोबाईल उद्योगात पहिल्या क्रमांकावर आहे. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात ग्राहकांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव येथे क्रेडाई ऑटो एक्स्पो प्रदर्शनात क्रेडाईचे अध्यक्ष दीपक गोजगेकर आणि यश इव्हेंट्सचे संचालक प्रकाश कालकुंद्रीकर यांनी लकी ड्रॉच्या तीन विजेत्यांची नावे जाहीर केली.
यावेळी विजय के. यांना टीव्हीएस ज्युपिटर बाईक, द्वितीय पारितोषिक टीव्ही बसव चोबारी यांना आणि तृतीय पारितोषिक सुशांत खन्नूरकर यांना मोबाईल फोन देण्यात आला.
या संदर्भात इन न्यूज चॅनलशी बोलताना क्रेडाईचे अध्यक्ष दीपक गोजगेकर आणि यश इव्हेंट्सचे चेअरमन प्रकाश कालकुंद्रीकर म्हणाले की, हायटेक मोटर्स ग्राहकांना तत्पर, चांगली सेवा देत असून अल्पावधीतच भरपूर वाहने विकून त्यांनी नाव कमावले आहे. भविष्यात त्यांची अशीच प्रगती होवो अशा शुभेच्छा दिल्या.

यावेळी हायटेक टीव्हीएस शोरुमचे संचालक विनय बाळीकाई म्हणाले की, बेळगावातील लोकांचे आम्हला खूप सहकार्य लाभत आहे. सध्या आमच्याकडे टीव्हीएस ज्युपिटर, टीव्हीएस रायडर, टीव्हीएस आय क्यूब या इलेक्ट्रिक वाहनांचा साठा आला आहे, आजच आमच्या शोरूमला भेट द्या आणि तुमच्या स्वप्नातील वाहन घरी घेऊन जा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी क्रेडाईचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.


Recent Comments