केएलई संस्थेने चिक्कोडी येथे सीबीएसई इंग्रजी माध्यम शाळा सुरु केली असून, येत्या 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री पद्मश्री डॉ. एस. जयशंकर यांच्याहस्ते या शाळेचे समारंभपूर्वक उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी दिली.
सोमवारी बेळगाव येथील केएलई मुख्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना प्रभाकर कोरे म्हणाले की, केएलईची 17 वी तालुकास्तरीय सीबीएससी अभ्यासक्रमाची इंग्लिश मीडियम शाळा आहे. विस्तीर्ण जागेत 17 कोटी रुपये खर्चून अतिशय सुबकपणे बांधण्यात आली आहे. केएलई संस्थेने अथणी, सौंदत्ती, बैलहोंगल, गदग, हावेरी, निपाणी, महाराष्ट्र आणि बेंगळूर येथे यापूर्वीच सीबीएससी अभ्यासक्रमाच्या शाळा सुरू केल्या आहेत. चिकोडीतील शाळेत खेळाचे मैदान, कॅन्टीन व्यवस्था असून, मुलांना दर्जेदार शिक्षण दिले जाईल. आगामी शैक्षणिक वर्षासाठी तेथे प्रवेश सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली.
28 फेब्रुवारीला चिक्कोडी शाळेच्या उद्घाटनासाठी केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, आमदार गणेश हुक्केरी, खासदार अण्णासाहेब जोल्ले, चिकोडी नगराध्यक्ष प्रवीण कांबळे, केएलईचे अध्यक्ष महांतेश कौजलगी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.


Recent Comments