अनंत कुमार यांना मानसिक रुग्णालयात दाखल करावे, असे म्हणत विजयपूर जिल्ह्याचे प्रभारी मंत्री एम बी पाटील यांनी खासदार अनंत कुमार यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे.
खासदार अनंतकुमार हेगडे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर केलेल्या जोरदार टीकेसंदर्भात, उद्योगमंत्री एम बी पाटील यांनी फटकारले आहे . अनंतकुमार यांना विजयपूर जिल्ह्यातील इंडी शहरातील मानसिक रुग्णालयात दाखल करावे. त्यांना निवडणूक लढवायची आहे, असा टोला त्यांनी लगावला. याआधी केंद्रीय मंत्री असलेल्या महाशयांनी घटनादुरुस्ती करावी असे म्हटले होते. अशा लोकांबद्दल जास्त बोलण्याची गरज नाही, कोणीही याकडे गांभीर्याने पाहत नाही, ही निवडणूक नौटंकी आहे, असे मंत्री एम.बी.पाटील म्हणाले.


Recent Comments