Belagavi

यरगट्टी तालुक्यातील कुरबगट्टी क्रॉसजवळ भीषण रस्ता अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

Share

भीषण रस्ता अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ,बेळगाव जिल्ह्यातील जिल्ह्यातील यरगट्टी तालुक्यातील कुरबगट्टी क्रॉसजवळ घडली . या अपघातात एक महिला आणि एका मुलासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

स्विफ्ट आणि अल्टो कारने एकमेकांना समोरासमोर ठोकारल्याने हा भीषण अपघात घडला . स्विफ्ट कारमधून सहा जण प्रवास करीत होते . त्यापैकी बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील पटगुंदी गावातील मुथु सत्यप्पा नायक (०८) , गोपाळ सत्यप्पा नायक (४५), धारवाड स्थित अन्नपूर्णा बाळेश शिरोळ (५३) यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला .

या अपघातातील तीन जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहे मुरगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

Tags: