Belagavi

बेळगावात चौथ्या मजल्यावरून पडून युवतीचा मृत्यू

Share

पाळीव कुत्र्याला टेरेसवर नेत असताना चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून पाय घसरून पडल्याने एक युवती जागीच ठार झाली. ही दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री बेळगावातील सदाशिवनगरमध्ये घडली.

ओशाना रोनाल्डो पाशेको (वय 21) असे मृत युवतीचे नाव आहे. सदाशिव नगर येथील ओम रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये काल, गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. ओशाना ही बीबीएची विद्यार्थिनी आहे. सदाशिवनगर येथील ओम रेसिडेन्सीच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ती कुटुंबासह राहत होती. त्यांच्या घरात एक पाळीव कुत्रा असून ती रात्री कुत्र्यासोबत चौथ्या मजल्यावरील टेरेसवर गेली होती. तिने घरच्यांना माहिती दिली आणि गच्चीवर गेली. कुत्र्यासोबत फिरत असताना पाय घसरून ती चौथ्या मजल्यावरून खाली पडली. तत्काळ रुग्णालयात नेत असतानाच डोकीला जबर मार बसल्याने तिचा मृत्यू झाला.

याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक ख्वाजा हुसेन या घटनेचा तपास करत आहेत.

Tags: