बेळगाव शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा उच्छाद सुरु झाला आहे. शहरातील महांतेशनगर येथील देसाई लॉनच्या मागील बाजूस भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याने चार मुले गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महांतेश नगर येथील देसाई लॉनच्या मागील बाजूस भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार मुले गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुले खेळत असताना भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी येथील नागरिकांनी महापालिकेकडे अनेकवेळा तक्रारी केल्या. मात्र कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.


Recent Comments