रामनगर न्यायालयात घुसणाऱ्या अनाहूत व्यक्तींना विरोध करून त्यांच्याविरोधात तक्रार देण्यास गेलेल्या वकिलांवरच खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ बेळगावात आज वकिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
रामनगर येथील एका न्यायालयात काही अनाहूत लोक अनधिकृतरित्या, कसलीही परवानगी नसताना घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना काही वकिलांनी विरोध केला. त्यानंतर त्या लोकांविरोधात ते पोलीस स्थानकात तक्रार देण्यास गेले असता, त्यांची तक्रार न घेता पोलिसांनी उलट वकिलांवरच खोटे गुन्हे दाखल केले. याच्या निषेधार्थ बेळगाव वकील संघटनेच्या वतीने आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना बेळगाव वकील संघटनेचे उपाध्यक्ष ऍड. विजय पाटील म्हणाले की, रामनगर येथील एका न्यायालयात काही अनाहूत लोक अनधिकृतरित्या, कसलीही परवानगी नसताना घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना काही वकिलांनी विरोध केला. त्यानंतर त्या लोकांविरोधात ते पोलीस स्थानकात तक्रार देण्यास गेले असता, पोलिसांनी उलट वकिलांवरच खोटे गुन्हे दाखल केले. याचा आम्ही निषेध करतो. त्याचप्रमाणे संबंधित पीएसआयला निलंबित करण्याच्या मागणीसाठी रामनगर वकील संघटनेने आंदोलन सुरु केले आहे.
त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्री जी. परमेश्वर, कायदा मंत्री एच. के. पाटील यांना निवेदन देत आहोत. त्यांनी व मुख्यमंत्र्यानी या घटनेची त्वरित गंभीर दखल घेऊन योग्य कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी बेळगाव वकील संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


Recent Comments