Belagavi

बेळगावात 7 ते 11 मार्चपर्यंत सीपीडी मैदानावर कृषी महोत्सव

Share

7 ते 11 मार्च या कालावधीत जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने शहरातील सीपीडी मैदानावर कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगौडा पाटील यांनी सांगितले.

बेळगावात मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना शिवनगौडा पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी भव्य कृषी महोत्सवाचे आयोजन करण्याची बेळगावात ही पहिलीच वेळ आहे. रोटरी क्लबच्या वतीने जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने विविध कृषी उत्पादन कंपन्या आणि यशस्वी शेती संस्थांचे सुमारे 150 स्टॉल लावून शेतकऱ्यांना पिकांची माहिती देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. शेतकऱ्यांना सुपीक पिके घेण्यासाठी कुशल तज्ज्ञांकडून माहिती दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगाव जिल्हा शेतीसाठी प्रसिद्ध आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कृषी महोत्सवासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आहे. शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारून चांगले शेतकरी शोधून त्यांच्यामार्फत इतर शेतकऱ्यांना माहिती दिली जाईल. लोकांनी याचा लाभ घ्यावा. कोरोनानंतर तरुणांमध्ये शेतीची आवड कमी झाली आहे. तरुणांना शेतीचे महत्व पटवून देण्यासाठी रोटरी क्लबच्या सहकार्याने कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनानंतर तरुणांनी शेती करणे कमी केले आहे. प्रामुख्याने तरुण शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाईल. आम्ही आमच्या जिल्ह्यात तृणधान्य मेळा यशस्वीपणे आयोजित केला आहे. त्यानंतर आता रोटरी क्लबच्या सहकार्याने कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बेळगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष मंजुनाथ अळवणी, पदाधिकारी अभय जोशी, शेख अली, दिनेश काळे, अजय हेडा, राजेंद्र देसाई आदी उपस्थित होते.

Tags: