Belagavi

बसवण्णांचा आदर्श जगामध्ये अंगीकारणे महत्त्वाचे : राहुल शिंदे

Share

बसवण्णा यांनी देशातच नव्हे तर जगात नावलौकिक मिळवला असल्याचे बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विश्वगुरू बसवण्णा यांना कर्नाटकचे सांस्कृतिक नायक घोषित करण्यात आले आहे. याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. बसवेश्वरांनीच लोकशाहीची संकल्पना आणली आणि सर्व मठाधिपतींनी ती मागणी केली. त्यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली असून त्याला मंजुरी मिळाली आहे.या पार्श्वभूमीवर आज बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालयात जगज्योती बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे म्हणाले की, बसवण्णा यांनी देशातच नव्हे तर जगात नावलौकिक मिळवला आहे.आपण सर्वजण संविधानावर बोलतो.संविधान येण्यापूर्वी जगज्योती बसवेश्वर यांनी अनुभव मंडप बांधून आम्हा सर्वांना जागरुक केले. समाज घडविण्यासाठी आपण सर्वांनी मेहनत करूया, असे ते म्हणाले.

यावेळी जिल्हा पंचायत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

Tags: