Belagavi

वेदांत फाउंडेशनच्या एक्सलन्स अॅवार्डचे वितरण : पोलिस ,शिक्षक, पत्रकारांना पुरस्कार वितरण

Share

बेळगाव येथील वेदांत फाउंडेशनच्या वतीने वेदांत एक्सलन्स अॅवार्डचे वितरण शनिवारी वितरण करण्यात आले . व्हॉइस ओव्हर : महिला विद्यालयाच्या इंग्रजी माध्यम शाळेत आयोजित केलेल्या या अध्यक्षस्थानी विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजय नंदिहळ्ळी उपस्थित होते

कार्यक्रमाचे उद्घाटन समृद्धी संस्थेचे सेक्रेटरी वीरेश किवडसण्णावर, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयकुमार हेबळ्ळी यांच्या हस्ते करण्यात आले . प्रमुख पाहुणे म्हून उपस्थित असलेले मार्कडेय साखर कारखान्याचे संचालक अविनाश पोतदार म्हणाले की , माणसाला मैत्री जी करायची असते ती गरज म्हणून करू नये . मैत्री सवय म्हणून करा करणं गरज संपली कि मैत्री संपते . जे लोक दुःखात अडीअडचणीत साथ देतात तेच खरे मित्र असतात . यावेळी त्यांनी फाऊंडेशनच्या कार्यालयाला शुभेच्छा दिल्या

बेळगाव शहर गटशिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ यांनी सांगितले कि सर्व व्यक्ती आणि सर्व कुटुंबांनी सर्व काही मिळवले आहे असे नाही. आपला भारत ही जगण्याची आणि इतरांची सेवा करण्याची संस्कृती आहे. आज विविध क्षेत्रात यश मिळविणाऱ्यांना ओळखून त्यांना बक्षीस देण्याचे काम वेदांत फाऊंडेशनने केले आहे. . ते म्हणाले की, कोविड परिस्थितीत कठोर परिश्रम करणाऱ्या अशा सज्जनांचा सन्मान करताना खूप आनंद होत आहे

यावेळी वेदांत फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणार्या नवरत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात आले . शिक्षक, पोलिस आणि पत्रकार यांचा यामध्ये समावेश होता . पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये सी. वाय. पाटील (ठळकवाडी हायस्कूल टिळकवाडी), बेबीअस्मा नाईक (सरकारी प्राथमिक शाळा शाहूनगर), अनुराधा तारिहाळकर (सरकारी प्राथमिक शाळा बसुर्ते), सुजाता लोखंडे (सरकारी प्राथमिक शाळा क्रमांक 24), पत्रकारामध्ये राजशेखर पाटील (इन न्यूज वाहिनी बेळगाव), शिवाजी शिंदे, (दैनिक पुढारी), सुनिल पाटील (द न्यू इंडियन एक्सप्रेस), पोलिस केंपाण्णा दोडमनी ( एपीएमसी पोलिस स्थानक), कशिनाथ इरगार (उत्तर विभाग रहदारी पोलिस स्थानक) यांचा शाल , सन्मानपत्र , रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला ,

रमेश आनंदाचे, शिक्षक संघटनेचे शहर अध्यक्ष बाबू सोगलण्णावर, आय. डी. हिरेमठ, प्राचार्या कविता परमानीक फांउडेशनचे अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष एन. डी. मादार, सचिव ईश्वर पाटील आदी उपस्थित यावेळी उपस्थित होते

Tags: