Belagavi

73 वर्षीय रमेश पुजारी यांची बेळगाव-बेंगळूर सायकल मोहीम

Share

सायकल भीष्म म्हणून प्रसिद्ध असलेल्या मूळचे कुंदापूरचे व अनेक वर्षांपासून संकेश्वर येथे राहणारे 73 वर्षीय रमेश पुजारी यांनी मुलांचे भविष्य मुलांच्या हातात सोडू नका, असा संदेश देऊन बेळगाव ते बेंगळूर सायकल मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.

बेळगावहून निघाले आणि देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी मंगळूर येथील कुद्रोली मंदिरात जाऊन दर्शन घेतले. बीसी रोडचे माजी केंद्रीय अर्थमंत्री, बिल्लव समाजाचे ज्येष्ठ नेते जनार्दन पुजारी यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेत त्यांनी एकूण 1000 किमीचा प्रवास करून आज दि.13/02/2024 रोजी बेळगाव गाठले. बिल्लव संघाचे अध्यक्ष सुनील पुजारी आणि सदस्य हॉटेल असोसिएशनचे माजी अध्यक्ष विजय सालियन यांनी त्यांचे स्वागत केले.

Tags: