Vijayapura

तरुणाने तरुणीला चपलेने मारल्याचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद

Share

एका संगणक प्रशिक्षण केंद्रात काम करणाऱ्या एका वेगळ्या समाजातील तरुणीला चपलेने मारल्याचा व्हिडीओ सीसी कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
विजयपूर तालुक्यातील नागठाण गावात ही घटना घडली असून श्रीशैल मासाळी नावाच्या तरुणाने हे कृत्य केले आहे. काल दुपारी घडलेली ही घटना आहे.

नागठाण गावातील एका संगणक प्रशिक्षण केंद्रात काम करणाऱ्या एका वेगळ्या समाजातील तरुणीचा काही दिवसांपासून विनयभंग होत असल्याचे सांगण्यात येत आहे. काल संगणक प्रशिक्षण केंद्रात जात असताना त्याने पुन्हा युवतीचा विनयभंग केला. त्यानंतर तरुणीने त्या तरुणाला जोडे दाखवले. श्रीशैल हे पाहून संतापला .
त्या

ने संगणक प्रशिक्षण केंद्रात जाऊन तरुणीला बाहेर आणले आणि चप्पलेने मारहाण केली. याप्रकरणी तरुणीने विजयपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणीने तक्रार करताच श्रीशैल हा तरुण पळून गेला. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून तपास सुरू आहे. युवती आणि तिच्या पालकांनी न्यायाची मागणी केली. याप्रकरणी विजयपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: