बेळगाव रेल्वे स्थानकासमोरील बसस्थानक हे दारुड्यांचा अड्डा आणि अस्वच्छतेचे माहेरघर बनले असून कॅन्टोन्मेंट बोर्डाने त्यावर उपाय करण्याची मागणी नागरीकातून होत आहे.
बेळगाव रेल्वे स्थानकासमोर स्मार्ट सिटी योजनेतून करोडो रुपयांच्या मोठ्या खर्चाने बांधलेले बसस्थानक दारुड्यांचा अड्डा बनले असून प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन जावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्मार्ट सिटीच्या बसस्थानकाचे व्यवस्थापन करण्यासाठी कंत्राटदाराची मुदत संपली आहे. ज्या स्मार्ट सिटीने त्यासाठी निविदा मागवायला हव्या होत्या, त्याकडेही दुर्लक्ष झाल्याने हा रस्ता दिवसाढवळ्या दारूच्या अड्ड्यात बदलला आहे, हे दुर्दैव आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे देखभालीसाठी हे बसस्थानक सोपवण्यात आले होते. बोर्डानेही आपली जबाबदारी झटकल्याने सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. स्थानकातील प्रवाशांसाठीची आसने व आजूबाजूची जागा गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगवलेली आहे. कचरा, दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि कार्टून्स सर्वत्र फेकून देण्यात आली आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी ही परिस्थिती बदलून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.


Recent Comments