Belagavi

संकेश्वर शहरात पीव्हीसी पाईप्स दुकानाला भीषण आग

Share

संकेश्वर शहरातील मुख्य रस्त्यावरील पीव्हीसी पाईपच्या दुकानाला अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. गुरुवारी आग लागल्याची घटना रात्री घडली.

संकेश्वर शहरातील बसस्थानकाजवळील संगमेश्वर ट्रेडर्स पीव्हीसी पाईपच्या दुकानाला गुरुवारी रात्री 8.30 च्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेत लाखो रुपयांचे साहित्य भस्मसात झाले. त्यामुळे दुकानमालकाचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने जीवहानी टळली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. संकेश्वर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

Tags: