Belagavi

महापौर-उपमहापौर कोण हे निवडणुकीदिवशी सकाळी सांगू : आ. अभय पाटील

Share

बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौरांची निवडणूक 15 फेब्रुवारीला होणार असून त्याच दिवशी सकाळी दोघांच्या नावांची घोषणा केली जाईल, असे बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांनी सांगितले.

बेळगावात शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले की, बेळगाव भाजप महानगर जिल्हाध्यक्षा गीता सुतार, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेके, अभय पाटील यांच्या देखरेखीखाली आज शुक्रवारी भाजप नगरसेवकांची बैठक होणार असून या बैठकीत इच्छुकांना अर्ज करता येणार आहेत. बैठकीत सर्व नगरसेवकांची मते ऐकून घेण्यात येतील. त्यानंतर कोअर कमिटीच्या बैठकीत नावे फायनल करून भाजप प्रदेशाध्यक्षांच्या निदर्शनास आणून देण्यात येतील. बेळगावच्या महापौर आणि उपमहापौरांची नावे निश्चित केल्यानंतर निवडणुकीच्या दिवशी सकाळीच त्यांची घोषणा केली जाईल, असे आमदार अभय पाटील म्हणाले.

महापौर पद एससी महिलेसाठी राखीव आहे. भाजपमध्ये सविता कांबळे आणि लक्ष्मी राठोड या दोन एससी महिला नगरसेविका आहेत. आहेत. कोअर कमिटीच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याचे आ. अभय पाटील यांनी सांगितले.

Tags: