बेळगाव बार असोसिएशनच्या 2 वर्षीय निवडणुकीसाठी आज वकील समुदाय भवनात उत्साहात मतदान पार पडले. निवडणुकीसाठी मतदान सुरळीत पारपडल्याची माहिती बेळगाव बार असोसिएशनचे निवडणूक अधिकारी रमेश मिरजकर यांनी दिली.
संविधानाचे पालन करत गोरगरिबांना न्याय मिळवून देणाऱ्या वकिलांनी आज बेळगाव वकील संघटनेच्या नव्या कार्यकारिणीसाठी उत्साहात मतदान केले. एकूण 2126 वकील मतदार असून त्यापैकी बहुसंख्य मतदारांनी मतदान केले. यासाठी बेळगाव जिल्हा न्यायालय आवारातील वकील समुदाय भवनात मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती.

दरम्यान, निवडणुकीबाबत इन न्यूजशी बोलताना बेळगाव बार असोसिएशनचे निवडणूक अधिकारी रमेश मिरजकर म्हणाले की, सध्या 6 पदांसाठी निवडणूक होत आहे. अध्यक्षपदासाठी एस. एस. किवडसन्नवर, सुनील सानिकोप्प, एस. सी. जैन निवडणूक लढवत आहेत. उपाध्यक्षपदासाठी विनायक गोटखिंडी, बसवराज मुगळी, विजय पाटील, शीतल रामशेट्टी, एम. ए. सय्यद, शिवराज शिंदे, सरचिटणीसपदासाठी देवराज बस्तवाडे, सतीश बिरादार, वाय. के. दिवटे, उमेशगौडा पाटील, रवींद्र तोटीगेर, सहसचिवपदासाठी 4 जण, समिती सदस्यपदासाठी 13 जण, महिला सदस्य पदासाठी 5 जण उमेदवार रिंगणात आहेत. एकूण मतदारसंख्या 2126 आहेत.
प्रत्येकाने मतदान करावेच. मतदानाची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर लगेचच आम्ही मतमोजणी सुरू करू. सर्व मतपत्रिकांमध्ये नोटा (NOTA) लागू करण्यात आला आहे. ही निवडणूक 2 वर्षांच्या कालावधीसाठी होणार आहे. सहाय्यक मतदान अधिकारी म्हणून 26 जण काम करत आहेत. एकंदर, दोन वर्षांच्या कालावधीसाठी होत असलेल्या बेळगाव वकील संघटनेच्या नव्या कार्यकारिणीची निवडणूक सुरळीत पार पडली. वकिलांनी विशेषतः युवा वकिलांनी उत्साहात मतदानात भाग घेतला.


Recent Comments