बेळगावच्या जिल्हा नोंदणी उपनिबंधक कार्यालयात 22 हजार रुपयांची लाच घेताना एक डाटा एन्ट्री ऑपरेटर लोकायुक्तांच्या जाळ्यात सापडल्याची घटना घडली आहे.
नोंदणी कार्यालयातील डेटा एन्ट्री ऑपरेटर लाच घेताना लोकायुक्तांच्या जाळ्यात सापडल्याची घटना बेळगावच्या जिल्हा नोंदणी कार्यालयात आज गुरुवारी घडली. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. नोंदणी उपनिबंधक कार्यालयात सेल डीडचे चलन देण्यासाठी 22 हजारांची मागणी करणाऱ्या सोमशेखर मास्तमर्डी याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लोकायुक्त एसपी हनुमंतरायप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी सब रजिस्ट्रार ऑफिसचा दरवाजा बंद करून नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली होती.


Recent Comments