Belagavi

बेळगाव ग्रामीण क्षेत्रात शैक्षणिक क्रांती घडवणार : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Share

बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. आगामी काळात ग्रामीण मतदार संघात शैक्षणिक क्रांती घडविणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

सोमवारी सायंकाळी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील मास्तमर्डी गावात श्री बसवेश्वर मंदिराच्या आवारात सुसज्ज समुदाय भवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन केल्यानंतर त्या बोलत होत्या. निवडणुकीपूर्वी दिलेले भव्य समुदाय भवन बांधण्याचे आश्वासन प्रत्यक्षात आले आहे. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने, बसवण्णा व गावातील सर्व देवतांच्या कृपेने मी या बांधकामाचे पूजन पूर्ण केले आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, यल्लाप्पा तोरली, प्रकाश पाटील, चन्नगौडा पाटील, चंद्रू जंगली, बाळुस्वामी कुरंगी, मंजुनाथ कोलकार, राघवेंद्र माविनकट्टी, मंजुनाथ पारीशवाड, विक्रम जंगली, बसवराज कोलकार, रुद्रय्या हंचीनमणी, श्रीशैल पाटील, विजय पाटील, संतोष मद्देप्पगोळ, एस. बी. शिवनाईकर, बसवराज तोरली, शिवनगौडा पाटील, इराप्पा माथारी, महानंद बसलिंग मरकट्टी आदी उपस्थित होते.

Tags: