सुवर्ण विधान सौधच्या मध्यवर्ती सभागृहात सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, क्षेत्रीय आरोग्य शिक्षणाधिकारी, तालुका वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ प्राथमिक आरोग्य निरीक्षक, फार्मासिस्ट, यांच्यासाठी आज रोटरी पल्स पोलिओ लसीकरण आणि एमइआय या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे उदघाटन करून बोलताना जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याणाधिकारी डॉ. महेश कोणी म्हणाले की, २०११ पासून भारतात रोटरी क्लबच्या माध्यमातून दरवर्षी सार्वत्रिक लसीकरण मोहीम राबविल्याने पोलिओची नवी प्रकरणे उघडकीस आली नाहीत. परंतु गेल्या काही वर्षांत शेजारील पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये अशी प्रकरणे आढळल्याने भारतात पुन्हा पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेऊन लसीकरण मोहिमेत योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.
जागतिक आरोग्य संघटनेच्या बेळगाव विभागाचे वैद्यकीय सर्वेक्षण अधिकारी डॉ. सिद्धलिंगय्या यांनी मार्गदर्शन केले. येळ्ळूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश दंडगी यांचे रोटसील या विषयावर व्याख्यान झाले. जिल्हा प्रजनन व माता बाल आरोग्य अधिकारी डॉ. चेतन कंकणवाडी यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी कार्यालय व राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


Recent Comments