Belagavi

खटल्याच्या आदेशाची प्रत मिळाल्यास कायदेशीर लढा देऊ : सतीश जारकीहोळी

Share

माझ्यावर फौजदारी खटला दाखल करण्यासाठी विशेष न्यायालयाने जारी केलेली प्रत मला मिळालेली नाही. ती मिळाल्यानंतर मी कायदेशीर लढा देईन, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

हिंदू शब्दाच्या विधानाशी संबंधित प्रकरणात सतीश जारकीहोळी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने दिल्याबद्दल मंत्री सतीश जारकीहोळी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

काही महिन्यांपूर्वी सतीश जारकीहोळी यांनी ‘हिंदू’ या शब्दाबाबत केलेले विधान वादात सापडले होते. एका वकिलाने याबाबत गुन्हा दाखल केला होता. कनिष्ठ न्यायालयात तो फेटाळण्यात आला. आता बघू या आदेशात काय आहे’, असे ते म्हणाले. निवडणुकीदरम्यान हे प्रकरण पुन्हा चव्हाट्यावर आणले आहे का, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘ही कायदेशीर लढाई आहे. त्यामुळे आम्ही कोर्टात लढू, बाहेर नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा उमेदवारीबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना ‘पक्षाच्या सर्वेक्षणात निवड झालेल्यांना बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे तिकीट दिले जाईल’, असे त्यांनी सांगितले.

Tags: