Belagavi

सांबरा येथे मारग मळण्याचा कार्यक्रम : उदे गं आई चा गजर आणि भंडाऱ्यांची उधळण

Share

सांबरा येथील माळरानावरील मारग मळण्याचा कार्यक्रम आणि यात्रा भक्तीमय वातावराणात साजरी केली. सामूहिक पडल्या भरण्याचा कार्यक्रम आणि सवाद्य मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरली.

सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रा करून माघारी परतलेल्या गावाकऱ्यांच्यावतीने मारग मळण्याचा कार्यक्रम पार पडला. आगामी महालक्ष्मी यात्राेनिमित्त होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमाची माहिती देवस्थान कमिटीच्यावतीने देण्यात आली. भावीकांच्या सोईसाठी ग्रामपंचायात आणि देवस्थान कमिटीच्यावतीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

सायंकाळी माळरांनावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. उदे गं आई चा गजर आणि भंडाऱ्यांची उधळण करत भाविक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. गावच्या वेशीतुन प्रवेश करत छ. शिवाजी महाराज चौक, मारूती गल्ली, लक्ष्मी गल्ली, भैरीदेव चौक, चावडी गल्लीमार्गे दुर्गादेवी मंदिर आवारात मिरवणूकीची सांगता झाली.

Tags: