Belagavi

बेळगावात पहिल्या पीव्हीआर आंतरराज्य भव्य जलतरण स्पर्धाना प्रारंभ

Share

बेळगावात पहिल्या दोन दिवसीय पीव्हीआर आंतरराज्य भव्य जलतरण स्पर्धाना शनिवारी प्रारंभ झाला. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातील विक्रमी सुमारे साडेतीनशे जलतरणपटूंनी या स्पर्धेत घेतला आहे.

बेळगावातील आबा क्लब, हिंद स्पोर्ट्स क्लब आणि क्रीडाभारतीकडून शनिवार दिनांक 3 व रविवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी पहिल्या पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धांचे आयोजन गोवावेस येथील कार्पोरेशन-रोटरी स्पोर्ट्स कादमीच्या जलतरण तलावात करण्यात आले आहे. या स्पर्धाना आज शनिवारी सकाळी साडेदहा वाजता प्रारंभ करण्यात आला.

स्पर्धेबाबत इन न्यूजला अधिक माहिती देताना, स्पर्धा संयोजक एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार यांनी सांगितले की, या जलतरण स्पर्धेत सुमारे साडेतीनशे जलतरणपटूंनी भाग घेतला आहे. बेळगावसह पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक, गोव्यातील पणजी, मडगाव आणि वास्को तसेच कर्नाटकातील बेंगळुर, हुबळी, धारवाड, मंड्या, दावणगेरे येथील अनेक नामांकित तसेच राष्ट्रीय विजेते जलतरणपटूंनी भाग घेतला आहे.

बेळगावात अनेक प्रतिभावंत जलतरणपटू आहेत. गोवावेस जलतरण तलाव अरुंद असल्याने त्यांना सराव करण्यात अडचणी येतात. त्यामुळे या तलावाची रुंदी ५० मीटर केल्यास जलतरणपटूंना सराव करण्यास वाव मिळेल. त्यातून ते अगदी ऑलिंपिकपर्यंत देखील मुसंडी मारू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, स्पर्धेचे आयोजन नेटक्या पद्धतीने केले असून, गोवावेस स्विमिंग पूलच्या प्रांगणात फूड स्टॉलची देखील सोय करण्यात आलेली आहे.

Tags: