Belagavi

घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Share

बेळगावातील मंडोळी रोडवरील एका अपार्टमेंटमधून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून पळून जाणाऱ्या आरोपीला टिळकवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

बेळगावमधील मंडोळी रोडवरील एका अपार्टमेंटमधून 77 ग्रॅम सोने आणि 550 ग्रॅम चांदीचे दागिने चोरल्याप्रकरणी आंध्रप्रदेशच्या राजू उप्पलापती नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. 42 लाखांचे दागिने चोरणाऱ्या आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून डीएसएलआर कॅमेराही जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी टिळकवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: