मराठी भाषेत मतदार याद्या पुरवण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने निवडणूक आयोगाकडे बेळगावमध्ये मराठी भाषेत मतदारयाद्या पुरवाव्यात यासाठी तक्रार अर्ज नोंदवण्यात आला होता. त्याला अनुसरून आज बेळगावच्या जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती पदाधिकाऱ्यांना बोलवून घेऊन मराठी मतदार याद्या या संकेतस्थळावर उपलब्ध झाल्या असून त्या पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत अशी माहिती दिली.
यावेळी समिती शिष्टमंडळाने पीडीएफ व्यतिरिक्त या मतदार याद्या छापील स्वरूपातही उपलब्ध करून द्याव्यात तसेच इतर निवडणूक प्रक्रियेतील कागदपत्रेसुद्धा मराठी भाषेत उपलब्ध करून द्यावीत, पीडीएफ मतदार याद्यांमधील नावात अनेक तफावती आहेत. त्या दुरुस्त कराव्यात अशी मागणी केली.
छापील याद्या या अधिकृत राष्ट्रीय राजकीय पक्षांना त्यांच्या मागणीनुसार उपलब्ध केल्या जातील असे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले व निवडणूक प्रक्रियेवेळी मराठी भाषेतील फॉर्म व अर्ज व इतर कागदपत्र उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. यावेळी म. ए. युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, समिती नेते ऍड. अमर येळूरकर, श्रीकांत कदम, विकास कलघटगी, आनंद पाटील आदी उपस्थित होते


Recent Comments