प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान जागृतीसाठी निघालेल्या संविधान जागृती जथ्याचे मुडलगी तालुक्यातील अरभावी गावात भव्य स्वागत करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान जागृतीसाठी काढण्यात आलेला संविधान जागृती जथा बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील अरभावी गावात पोहोचला. त्यावेळी जथ्याचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी नगर पंचायत सदस्य, जनता, समाजाचे नेते, अधिकारी व कर्मचारी, आशा वर्कर्स व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. याद्वारे संविधानाचे महत्त्व व महानता लोकांपर्यंत पोहोचवून जनजागृती करण्यात आली.


Recent Comments