जगज्योती विश्वगुरु बसवण्णांची “कर्नाटकचे सांस्कृतिक नेते” म्हणून केलेली घोषणा स्वागतार्ह आहे. मात्र त्यांना “आराध्य दैवत” म्हणून दर्जा द्यावा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी केली आहे.
बेळगावात बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना भीमाप्पा गडाद म्हणाले की, ‘कर्नाटक सांस्कृतिक नेते’ म्हणून झालेली घोषणा स्वागतार्ह आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ देत ते म्हणाले की, विश्वगुरु बसवण्णा यांना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा राज्याचे आराध्य दैवत जाहीर करावी, अशी मागणी केली.
राज्यातील 9 मंत्री आणि 35 आमदारांनी बसवण्णा यांच्या नावाने रीतसर शपथ घेतल्यावर दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणीत हायकोर्टाने बसवण्णा हे देव असल्याचं सांगितलं. राजकीय पक्षांनी बसवण्णा हेच दैवत असल्याचं जाहीर केलं नाही तर पुढील निवडणुकीत त्याचा फटका बसेल असा इशारा गडाद यांनी दिला.


Recent Comments