Belagavi

पी. के. बडिगेर यांना केयूडब्ल्यूजेचा सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचा पुरस्कार

Share

कर्नाटक असोसिएशन ऑफ वर्किंग जर्नालिस्टच्या 2022-23 व्या वार्षिक पुरस्कार श्रेणीमध्ये बेळगावचे प्रसिद्ध छायाचित्रकार पी. के. बडिगेर यांना सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचा पुरस्कार मिळाला आहे.

मूळचे सौंदत्ती तालुक्यातील मदलूर गावचे असलेले पी. के. बडिगेर हे गेल्या तीन दशकांपासून बेळगावमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांनी ‘संयुक्त कर्नाटक’, ‘उदयवानी’, ‘द हिंदू’ तसेच माहिती व जनसंपर्क विभागासह बेळगावातील अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रेस फोटोग्राफर म्हणून काम केले आहे. आपल्या उकृष्ट फोटोग्राफीमुळे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Tags: