Belagavi

श्रीराम सेना हिंदुस्थान शहापूर विभागातर्फे भव्य शोभायात्रा

Share

श्रीराम सेना हिंदुस्थान शहापूर विभागातर्फे सोमवारी सायंकाळी शहापुरात अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात्रेत ‘जय श्री राम’ आणि ‘शिवाजी महाराज की जय’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला.

शोभायात्रेत रथावर श्रीराम व शिवराय यांची आकर्षक मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. शोभायात्रेला शिवाजी महाराज उद्यान, शहापूर येथून प्रारंभ झाला. प्रथम रथाचे पूजन शहापूर पोलीस ठाण्याचे सीपीआय सिद्धू सीमाणी, बेळगाव जिल्हा वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष शंकर बाबली महाराज यांच्या हस्ते झाले. म. ए. समितीचे नेते विकास कलघटगी, सागर पाटील, महादेव पाटील, रेणुका मंडोळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

शोभा यात्रेत रामाचे मोठे कटआऊट सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. श्रीराम तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. रात्री उशिरा नाथ पै सर्कल येथे शोभायात्रेची सांगता करण्यात आली. श्रीराम सेना हिंदुस्तानचे कार्यकर्ते तसेच श्रीराम भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Tags: