चिक्कोडी मतदार संघातून भाजपचा उमेदवार कोण असावा हे हायकमांडच ठरवेल, भाजप हायकमांडच्या निर्णयाला आपण बांधील असल्याचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी सांगितले.
बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना चिक्कोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले की, चिक्कोडी मतदारसंघात भाजपचे तिकीट इच्छुक अनेकजण आहेत. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत चिक्कोडीतून भाजपचा उमेदवार कोण असावा हे हायकमांड ठरवेल. हायकमांड ज्याला तिकीट देईल, त्याच्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन, असे ते म्हणाले.


Recent Comments