Belagavi

मला अध्यक्षपदावरून हटवण्याचा विषय चर्चेला आला नाही : रमेश कत्ती

Share

आपल्याला बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी (बिडीसीसी) बँकेच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्याचा विषय बँकेच्या सभेत चर्चेला आला नाही, हा विषय आमच्या संचालकांच्याही चर्चेत आलेला नाही, असे बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी स्पष्ट केले.

बेळगावात मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी खासदार रमेश कत्ती म्हणाले की, मला अध्यक्षपदावरून हटवण्याचा विषय बँकेत चर्चेला आलेला नाही. मला अध्यक्षपदावरून हटवले जाईल, हे आमच्या संचालकांच्या ध्यानात आलेले नाही. या सगळ्या निव्वळ अफवा आहेत. सुमारे तीन तास सर्वजण बैठकीस उपस्थित होते, पण या विषयाचा उल्लेखही झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: