युवकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने लक्ष्मीताई फौंडेशन दरवर्षी ग्रामीण खेळांना मदत करते. त्याचा युवकांनी सदुपयोग करून घ्यावा असे आवाहन विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी केले.
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील सुळेभावी येथे प्रीमियर लीग सीझन 4 हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचे विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी उद्घाटन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, तरुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दरवर्षी लक्ष्मीताई फौंडेशन ग्रामीण खेळांना मदत करते. ग्रामीण भागातील अनेक शाळांना क्रीडा साहित्याचे वाटप केले जाते. युवक संघटनांना जिमची उपकरणे दिली. याचा सर्वांनी चांगला उपयोग करून घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

यावेळी गावातील वडीलधारी मंडळी फकीराप्पा अमरापुर, महेश सुगेनवर, बसनगौडा पाटील, बसय्या हिरेमठ, सिद्दय्या मंतुरंगीमठ, तिप्पण्णा लोकरे, संभाजी यमोजी, नागय्या कुडचीमठ, लक्ष्मीनारायण कल्लूर, दत्ता बंडीगेनी, विठ्ठल बंडीगेनी, मंजुनाथ पुजेरी, मल्लेश कसल्ली, मंजूनाथ पातली, कल्लाप्पा कामकर व सुळेभावी ग्रामस्थ उपस्थित होते


Recent Comments