“उदे गं आई उदे”, “याकुंदे जोगवा”च्या जयघोषात, पारंपरिक पद्धतीने पडल्या भरून बेळगावात रेणुका-यल्लम्मा देवीच्या भक्तांनी नौगोबाची यात्रा भक्तिभावाने साजरी केली.
शाकंभरी पौर्णिमेनिमित्त सौंदत्ती डोंगरावरील रेणुका-यल्लम्मा देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन परतलेल्या बेळगाव शहर व परिसरातील भाविकांनी रविवारी शहरातील केएसआरटीसी कंपाउंड, किल्ला परिसर आणि तानाजी गल्ली छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल परिसरात पारंपरिक पद्धतीने पडल्या भरून श्रद्धा-भक्तीने नौगोबाची यात्रा साजरी केली.
बेळगाव परिसरातील लाखो भाविक शाकंभरी पौर्णिमेनिमित्त सौंदत्ती डोंगराला जाऊन यल्लम्मा देवीचे दर्शन घेतात. ते बेळगावात परतल्यानंतर बेळगाव शहर देवस्थान मंडळातर्फे दरवर्षी नौगोबाची यात्रा आयोजित करण्यात येते. यंदाही लाखो भाविकांनी सौंदत्ती डोंगरावर जाऊन देवीचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर बेळगावात परतल्यावर त्यांनी शहरातील शिवाजीनगर केएसआरटीसी कंपाउंड, किल्ला परिसर आणि तानाजी गल्ली छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल परिसरात वास्तव्य केले. रविवारी दुपारी शिवाजीनगर केएसआरटीसी कंपाउंड येथे नौगोबाची यात्रा साजरी करण्यात आली.

अनंतशयन गल्लीतील श्री रेणुकादेवी मुखवट्याबरोबरच गणाचारी गल्लीतील बिरदेव सासनकाठी व महालक्ष्मीदेवी, कसाई गल्ली येथील मातंगी देवीची विशेष पूजा करण्यात आली. भंडाऱ्याची उधळण करत महिला भाविकांनी पडल्या भरण्याचा पारंपरिक विधी पार पाडला.
यावेळी बेळगाव शहर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील, परशुराम माळी यांच्या उपस्थितीत यात्रा पार पडली. फ्लो


Recent Comments