Belagavi

सिद्धी महिला मंडळातर्फे हळदीकुंकू समारंभ

Share

बेळगावातील टिळकवाडीतील सिद्धी महिला मंडळातर्फे हळदीकुंकू व सांस्कृतिक समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.

टिळकवाडी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात रविवारी सिद्धी महिला मंडळातर्फे हळदीकुंकू व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी एकमेकीला हळदीकुंकू व वाण देऊन शुभेच्छा दिल्या. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले.

यावेळी सिद्धी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनीता सुभेदार-जाधव, सचिव नीता पाटील, खजिनदार अश्विनी गोडसे, अनुजा कारेकर, पल्लवी, वर्षा गिलबिले, दीपा रुटकुटे, तवनोजीचे यांच्यासह मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या.

Tags: