कर्नाटक युनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्ट्स क्रिकेट स्पर्धेचा आजचा अंतिम सामना मीडिया इलेव्हन संघाने आठ विकेटनी जिंकून केयुजेडब्ल्यू ट्रॉफी पटकावली .
दोन दिवसीय केयुडब्ल्यूजे चषक क्रिकेट टुर्नामेंटला बेळगावातील पोलीस परेड मैदानावर कालपासून सुरुवात झाली होती . कालच्या पहिल्या सत्रात प्रिंट मीडिया इलेव्हन, कॉर्पोरेशन इलेव्हन, बेलगाम नॉर्थ एमएलए इलेव्हन, इलेक्ट्रॉनिक मीडिया इलेव्हन, केएलई इलेव्हन, फॉरेस्ट इलेव्हन, एक्साइज इलेव्हन, एसपी इलेव्हन, बेलगाम साऊथ एमएलए इलेव्हन, बीम्स इलेव्हन, पोलीस कमिशनर इलेव्हन, डीसी इलेव्हन, केयुडब्ल्यूजे इलेव्हन या संघांनी भाग घेतला. अत्यंत उत्साहात हे सामने खेळविण्यात आले
आज झालेल्या अंतिम सामन्यात , मीडिया ११ संघाने , केयुडब्ल्यूजे ११ संघावर ८ गाडी राखून विजय मिळवला . केयुडब्ल्यूजे ११ संघ उपविजेता ठरला . या सामन्यांमध्ये केयुडब्ल्यूजे इलेव्हन संघाच्या स्टीफन याना बेस्ट बॅट्समन , सुशांत याना बेस्ट बॉलर , हेमंत याना कॅचर तर मीडिया ११ संघाच्या शशी याना बेस्ट ऑल राऊंडर , अरबाज याना बेस्ट विकेटकीपर , संतोष के याना बेस्ट फिल्डर चे पारितोषिक देण्यात आले .

या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाला , पोलीस आयुक्त सिद्रामप्पा, एसपी भीमाशंकर गुळेद , डॉ . गिरीश सोनवलकर , सर्वोत्तम जारकीहोळी , एसीपी सदाशिव कट्टीमनी , नगरसेवक हनमनाथ कोंगाळी उपस्थित होते .
यावेळी बोलताना , पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी कर्नाटक श्रमिक पत्रकार संघाच्या जिल्हा शाखेने आयोजित केलेल्या या स्पर्धेची प्रशंसा केली . सर्वानी अतिशय उत्तम रित्या खेळाचे प्रदर्शन केले . भावी काळात अशा स्पर्धा आयोजित करण्यास प्रोत्साहन देऊ असे सांगून , अंतिम सामन्यातील विजेत्या आणि उपविजेत्या संघाचे अभिनंदन केले
तर एसपी भीमाशंकर गुळेद यांनी देखील कालपासून सुरु असलेल्या या क्रिकेट स्पर्धेची प्रशंसा केली . आपल्या व्यस्त जीवनातून ,आपल्या आरोग्यासाठी खेळ हे उत्तम साधन आहे . अशा प्रकारच्या खेळांमुळे आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ चांगले राहते . त्यामुळे निवळ स्पर्धेसाठी नाही तर नियमित खेळ आणि व्यायाम केला पाहिजे असे सांगून त्यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले . ( )
डॉ . गिरीश सोनवलकर यांनी देखील विजेत्या आणि उपविजेत्या संघाचे अभिनंदन केले . आणि आयोजकांचेही अभिनंदन केले . ( )
तर सर्वोत्तम जारकीहोळी यांनी देखील पहिल्यांदाच बेळगावमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आयोजित केलेल्या केयुडब्ल्यूजे चषक क्रिकेट टुर्नामेंटच्या आयोजकांचे अभिनंदन केले . या स्पर्धेत १५ संघ सहभागी झाले होते . पुढील वेळी यापेक्षा जास्त संघ सहभागी होतील असे सांगून त्यांनी सर्वाचे अभिनंदन केले .
यावेळी , पुंडलिक बाळोजी , दिलीप कुरुंदवाडे , राजशेखर पाटील , श्रीकांत कुबकट्टी , मंजुनाथ पाटील , श्रीशैल मठद , नौशाद बिजापूर उपस्थित होते .


Recent Comments