रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात , बसवरील नियंत्रण सुटल्याने , बस रस्त्याच्या कडेला पलटी होऊन तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे .
विजयपूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील हलगणी क्रॉसजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात बस चालक व दोन प्रवासी जखमी झाले असून त्यांना रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. बस क्रमांक KA 29 F 1102 जमखंडीहून विजयपूरला जात असताना हा अपघात झाला. ही घटना बबलेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.


Recent Comments