कर्नाटक युनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्ट्स क्रिकेट स्पर्धेला बेळगावात आज शानदार प्रारंभ करण्यात आला. आमदार राजू सेठ, शहर पोलीस आयुक्त एस. एन. सिद्रामप्पा, एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद आदी मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंची ओळख करून घेऊन या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.
दोन दिवसीय केयुडब्ल्यूजे चषक क्रिकेट टुर्नामेंटला बेळगावातील पोलीस परेड मैदानावर आज उत्साहात प्रारंभ झाला. आमदार राजू सेठ यांच्या हस्ते ट्रॉफीचे अनावरण करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. एकूण 16 संघांपैकी पहिल्या सामन्यात प्रिंट 11, कॉर्पोरेशन 11, बेलगाम नॉर्थ एमएलए 11, दुसऱ्या सामन्यात मीडिया 11 संघाने उत्साहाने क्रिकेट खेळले.
यावेळी आमदार राजू शेठ म्हणाले की, श्रमिक पत्रकार संघाच्या जिल्हा शाखेने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर झाले याचा आनंद आहे. कामाचा ताण विसरून शनिवार आणि रविवारी क्रिकेटसारखे खेळ खेळल्याने विरंगुळा मिळतो. त्याचप्रमाणे सदृढ राहण्यासही मदत होते.

पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा म्हणाले की, दिलीप कुरंदवाडे व सहकाऱ्यांनी श्रमिक पत्रकार संघाच्या जिल्हा शाखेकडून चांगल्या हेतूने क्रिकेटचे आयोजन केले आहे. आज सर्व पत्रकार व अधिकारी एकत्र क्रिकेट खेळत आहेत. एसपी भीमाशंकर गुळेद म्हणाले की, श्रमिक पत्रकार संघाच्या जिल्हा शाखेकडून क्रिकेटचे आयोजन करण्यासाठी पत्रकारांनी खूप परिश्रम घेतले आहेत. एक चांगले व्यासपीठ निर्माण झाले आहे. पत्रकार आणि अधिकारी वर्ग एकत्र आले आहेत. खेळ माणसासाठी खूप महत्वाचा आहे, असे ते म्हणाले. .
डीसीपी रोहन जगदीश म्हणाले की, आज पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा पोलीस परेड मैदानावर आयोजित क्रिकेट स्पर्धा बघून मजा येते. क्रिकेट हा चांगला खेळ आहे. सार्वजनिक मैदानात हा खेळ खेळल्यास अनेक लोक त्याचा आनंद घेतील. मी क्रिकेट पाहण्यासाठी उत्सुक आहे. बाइट
डॉ. गिरीश सोनवालकर म्हणाले की, दैनंदिन कामाच्या दडपणात मिडीयाचे मित्र गुंतलेले असतात आणि आरोग्य चांगले ठेवण्यासाठी क्रिकेटचा सहभाग असतो, असे सांगून क्रिकेट हा शरीरासाठी चांगला खेळ आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा, एसपी भीमाशंकर गुळेद, डीसीपी रोहन जगदीश, डॉ. गिरीश सोनवलकर, श्रमजीवी पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष पुंडलिक बालोजी, जिल्हाध्यक्ष दिलीप कुरंदवाडे, उपाध्यक्ष व इन न्यूजचे प्रधान संपादक राजशेखर पाटील, मंत्री सतीश जारकीहोळी यांचे आप्त सचिव मलगौडा पाटील, मंजुनाथ कांबळे, डॉ. संजय डुमगोळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments