Belagavi

कडोली ग्रापंतर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात

Share

बेळगाव तालुक्यातील कडोली ग्राम पंचायतीतर्फे ७५ वा प्रजासत्ताक दिन देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कडोली ग्राम पंचायत कार्यालयासमोर झालेल्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमापूर्वी श्री शिवाजी हायस्कुलच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांनी गावामध्ये बँडच्या तालावर शानदार प्रभातफेरी काढली.

ग्रापं अध्यक्ष सागर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रापं.सदस्या डॉ. प्रतिभा पाटील, संजना जाधव, सुरेखा पवार व संगीता चिंचणगी यांनी फोटो पुजन केले. ग्रापं सदस्य नागेश बांदिवडेकर यांनी नारळ वाढवला. ग्रापं कर्मचारी नामदेव रुटकुटे यांनी ध्वजस्तंभाचे पुजन केले तर पिडिओ श्रीमती कृष्णाबाई भंडारी यांनी ध्वजारोहण केले.

यावेळी बोलताना कृष्णाबाई भंडारी यांनी, सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या प्रयत्नाने ग्रापंतर्फे हाती घेतलेल्या योजनांची माहिती देऊन सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  डॉ. विनोद पाटील यांनी स्वागत व सूत्रसंचालन करून आभार मानले. यावेळी आजी माजी ग्रापं सदस्य, ग्रापं पदाधिकारी, गावचे प्रतिष्ठित व्यक्ति अंगणवाडी व आशा कार्यकर्त्या,शिवाजी हायस्कूलचे विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होता.

Tags: