विजयपूर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला . विजयपूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी तालुक्यातील मनगुली गावाजवळ २.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला.
KSNDMC अहवालाच्या आधारे, विजयपूर जिल्हा प्रशासनाने भूकंप रात्री 8:40 वाजता झाल्याची पुष्टी केली. पृथ्वीपासून 5 किमी खोलीवर 2.6 रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवला गेला. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्याने अनेक भूकंप अनुभवले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


Recent Comments