Belagavi

वाशीम येथील कराटे स्पर्धेत बेळगावच्या संघाला उत्कृष्ट टीम अवार्ड

Share

शोटोकोन कराटे डू स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वाशीम-महाराष्ट्र शाखेतर्फे वाशीम जिल्हा क्रीडांगणावर नुकत्याच झालेल्या इंटरनॅशनल ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत एसकेएसए इंटरनॅशनल मान्यताप्राप्त बेळगावच्या मानस कराटे स्पोर्ट्स अकॅडमीच्या संघाला बेस्ट टीम अवार्ड मिळाले आहे.

वाशीम जिल्हा क्रीडांगणावर शिहान सुनील देशमुख, शिहान सचिन कोकणे आणि सेन्सुई भरमानी मल्लाप्पा पाटील यांच्या उपस्थितीत इंटरनॅशनल ओपन कराटे चॅम्पियनशिप पार पडली. या स्पर्धेत बेळगावच्या मानस कराटे स्पोर्ट्स अकॅडमीच्या चलवेनहट्टी, बेकिनकेरे, अगसगा आणि विजयनगर-हिंडलगा येथील कराटेपटूंनी भाग घेऊन विविध प्रकारांत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके पटकावली.

प्रथम पाटील, संदेश रेडेकर, तनुजा डोनकरी, सत्यम पवार, विनायक येळ्ळूरकर, अमर मुरकुटे, प्रजुषा पाटील, ओमकार तवनोजी, धनराज पाटील, संस्कार चलवेनट्टी, सुमित खादरवाडकर, सुदर्शन लटी, लक्ष्मी खादरवाडकर, महादेव बसरीकट्टी, नेहाल पाटील, पृथ्वीराज कांबळे, धनराज पाटील, संकेत तवनोजी, शेखर बसर्गे या सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेऊन घवघवीत यश संपादन केले.

या कराटेपटूंना मानस कराटे अकादमीचे संचालक व प्रशिक्षक सेन्सुई भरमानी मल्लाप्पा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेमध्ये झारखंड, गुजरात, मध्यप्रदेश, कोलकाता, कर्नाटक महाराष्ट्र, तेलंगणा, आदी राज्यातून 1500 हुन अधिक कराटेपटूंनी भाग घेतला होता. त्यात कर्नाटक संघाला चॅम्पिअनशिप मिळाली आहे.

Tags: