Belagavi

बेळगावात जिल्हा प्रशासनातर्फे राष्ट्रीय मतदार दिन साजरा

Share

बेळगाव जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि विविध खात्यांच्या सहयोगाने बेळगावात आज जनजागृती जथा काढून राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. सशक्त राष्ट्रासाठी मतदानाचा पवित्र अधिकार विवेकाने वापरा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

राष्ट्रीय मतदार दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयापासून कुमार गंधर्व मंदिरापर्यंत जनजागृती जथा काढण्यात आले. त्यानंतर कुमार गंधर्व रंगमंदिरात राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम पार पडला.

यावेळी बोलताना बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय नागन्नवर म्हणाले की, आपले भारताचे संविधान संपूर्ण जगासाठी एक आदर्श आहे. आपल्या देशातील निवडणुकांप्रमाणे इतर देशात निवडणुका होऊ शकत नाहीत, आपल्या देशात अत्यंत पारदर्शक पद्धतीने निवडणुका घेतल्या जातात.

जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की, भारतात दर 5 वर्षातून एकदा लोकसभा व विधानसभा निवडणुका पारदर्शकपणे घेतल्या जातात. आपला देश भारत हा संपूर्ण जगात मोठे प्रजासत्ताक आहे. त्याला सशक्त बनवण्यासाठी मतदानाचा पवित्र अधिकार वापरून सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

महापालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी म्हणाले की, प्रत्येक नागरिकाने कोणत्याही प्रकारे पैशाची अपेक्षा न ठेवता 5 वर्षातून एकदा येणाऱ्या निवडणुकीत सद्सद्विवेक बंदीने मतदान करून आपला हक्क बजावला पाहिजे. युवक व विद्यार्थ्यांनी निवडणुकीबाबत जागृती करावी. बाइट
यावेळी बेळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, डीसीपी पीव्ही स्नेहा, रेश्मा तालिकोटे, राजश्री जैनापुरे यांच्यासह मोठ्या संख्येने शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी जथा आणि कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Tags: