पायाला जखम झाल्याने असायचे अवस्थेत पडून असलेल्या एका भिक्षुकाच्या मदतीला , सामाजिक कार्यकर्त्यांनी धावून जात , त्याला उपचारासाठी , बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करून माणुसकीचे दर्शन घडवले आहे .
बेळगाव शहरातील , धर्मवीर संभाजी महाराज सर्कल येथील , दुसऱ्या बसथांब्याशेजारी हा जखमी गरीब व्यक्ती गेल्या अनेक दिवसांपासून पडून होती . याची माहिती मिळताच श्रीराम सेने , यंग बेळगाव फौंडेशन आणि फेसबुक फ्रेडन्स सर्कलचे कार्यकर्ते तात्काळ , त्या बसस्टॉप जवळ दाखल झाले आणि त्यांनी त्या भिक्षुकांची विचारपूस केली . त्याच्या पायाला झालेल्या जखमेत अळ्या निर्माण झाल्याने , त्याची अवस्था एकदम बिकट झाली होती . त्यामुळे या कार्यकर्त्यांनी , रुग्णवाहिका मागवून , स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने त्या व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले .

यावेळी नारू निलजकर , अवधूत तुडवेकर , अलनविजय मोरे , संतोष दरेकर , भारत पाटील , सुरज धर्मोजी यांनी माणुसकी जपत त्या भिक्षुकाला वैद्यकीय मदत मिळवून दिली


Recent Comments